AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किल्ल्यावरुन ढकललं पण वाचली, नवऱ्याला सोडून 2 पुरुषांसोबत लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलेचा नको त्या अवस्थेत आढळला मृतदेह

नवऱ्याला सोडल्यानंतर महिला 2 पुरुषांसोबत लिव्ह - इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. पण महिलेला आधी किल्ल्यावरुन ढकलून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण प्रयत्न फेल ठेरल्यानंतर काही दिवसांनी महिलेचा मृतदेह खोलीत नकोत्या अवस्थेत आढळून आला.

किल्ल्यावरुन ढकललं पण वाचली, नवऱ्याला सोडून 2 पुरुषांसोबत लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलेचा नको त्या अवस्थेत आढळला मृतदेह
| Updated on: Jul 03, 2026 | 2:57 PM
Share

नवऱ्याला सोडल्यानंतर महिला स्वतःच्या अटी – शर्थींवर जगू लागली. नवऱ्यापासून विभक्त झाल्यानंतर महिलेने दोन पुरुषांसोबत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. पण दोन पुरुषांसोबत राहणं महिलेला महागात पडलं. महिलेला संपवण्यासाठी तिला सर्वात आधी किल्ल्यावरुन फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण ती वाचली. त्यानंतर अचानक महिलाचा मृतदेह तिच्या घरात नको त्या अवस्थेत सापडला. संबंधित घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरातील हजीरा पोलीस ठाणे परिसरात घडली आहे. घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. घटना घडल्यानंतर महिलेच्या दोन्ही जोडीदारांनी एकमेकांवर आरोप करण्यास सुरुवात केली. तर मृत महिलेच्या भावाने दोन्ही जोडीदारांवर गंभीर आरोप केले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोले आणि चौकशी सुरु केली. मिळालेल्या माहितीनुसार, कैलारस येथे राहणाऱ्या आरती धाकड हिचं लग्न 12 वर्षांपूर्वी अतर सिंग याच्यासोबत झालेलं. त्यांना दोन मुलं देखील आहे. घरगुती वादानंतर आरती हिने नवऱ्याला तीन वर्षांपूर्वी सोडलं आणि ग्वाल्हेर येथे एका भाड्याच्या घरात राहू लागली. एवढंच नाही तर, ई – रिक्षा चालवून आरती तिच्या मुलांचं पालन – पोषण देखील करत होती.

याच दरम्यान, आरतीची ओळख धर्मेंद्र दोहरे आणि संजू दोहरे या दोन व्यक्तींसोबत झाली. त्यानंतर आरतीच्या घरी त्यांचं येणं – जाणं देखील वाढू लागलं आणि आरतीने दोघांसोबत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. बुधवारी आरतीचा मृतदेह घरात जमिनीवर संशयास्पद परिस्थितीत आढळून आला.

संजू दोहरे याने केलेल्या दाव्यानुसार, दुपारी आपली गाडी चालवून घरी परतल्यावर त्याला घराचा दरवाजा आतून बंद असल्याचं आढळलं. काही वेळाने धर्मेंद्र घामाघूम अवस्थेत बाहेर आला; विचारणा केली असता त्याने आरती अंघोळ करत असल्याचं सांगितलं आणि तिथून पळ काढला. संजूचा आरोप आहे की, धर्मेंद्र सतत दारू प्यायचा आणि तो वारंवार आरतीला मारहाण करायचा; त्यानेच उशीने तोंड दाबून आरतीची हत्या केली.

तर धर्मेंद्र याने देखील संजू याच्यावर आरोप केले आहे. धर्मेंद्रने आरतीचा मोबाईल फोन देखील आपल्यासोबत नेला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासातून असं समोर आलं आहे की, सुमारे दोन महिन्यांपूर्वी धर्मेंद्रने आरतीला किल्ल्यावरून खाली ढकलून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामध्ये तिच्या पायाला दुखापत झाली होती. हजिरा पोलीस ठाण्याचे प्रभारी जितेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, जरी धर्मेंद्रवरच प्राथमिक संशय बळावला असला, तरी मृत महिलेच्या शरीरावर बाह्य जखमेच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. मृत्यूचं खरं कारण शवविश्चेदनानंतर समोर येईल… असं देखील पोलिसांचं म्हणणं आहे.

Follow Us
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा