
सारंखेडाच्या चेतक फेस्टिवल हा घोड्यांच्या सर्वात मोठा फेस्टिवल म्हणून ओळखला जात आहे. या फेस्टिवलमध्ये अशी एक मोरणी आली आहे. जिची उंची सर्वांना लाजवेल अशी आहे.

उत्तर प्रदेशच्या रायबरेलीच्या आर.ए स्टार्ट फॉर्मची मोरणी सारंगखेड्याच्या अश्व बाजारात दाखल झाली आहे. अवघ्या चार वर्षात 69 इंच आणि पूर्ण काळ्या रंगाची डोक्यावर पांढरे शुभ्र तरंग असल्याने मोरणी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

मोरणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एखादी हीरोइन ज्या पद्धतीने स्वतःची काळजी घेते, त्याच पद्धतीने मोरणीची काळजी घेतली जाते. काळजी घेण्यासाठी नेहमी चार माणसं तिच्या सोबत असतात.

रायबरेलीच्या RA स्टडफॉर्मची मोरणी ही मारवाड जातीची असून, ती अतिशय रुबाबदार, पूर्ण काळ्या रंगाची आणि डोक्यावर पांढऱ्या रंगांचे तरंग आणि तिचे चारी पाय पांढरे आहेत. त्यामुळे ती खूप सुंदर दिसते.

देशातील अनेक कानाकोपऱ्यातील अश्वप्रेमींनी मोरणीला खरेदी करण्यासाठी लाखो रुपये मोजण्याची तयारी दर्शवली आहे, मात्र शुभ लक्षण असल्यामुळे आम्ही ही घोडी विकलेली नाही अशी प्रतिक्रिया मोरणीचे मालक नाझीम भाई यांनी दिली आहे.