
जगभरात मांसाहार करणाऱ्यांची संख्या बरीच आहे. जगात असे काही महागडे मांसाहारी खाद्यपदार्थ आहेत ज्यांची किंमत वाचून तुम्हाला धक्काच बसेल. यातील काही खाद्यपदार्थ तर थेट सोन्याच्या पेटीमध्ये खायला दिले जातात. या खाद्यपदार्थांना तयार करण्याची पद्धत, त्यांची दुर्मिळता यामुळेच हे खाद्यपदार्थ खूप महाग आहेत.

अल्मास कॅव्हियार हा खाद्यपदार्थ सर्वात महाग असल्याचे मानले जाते. हे एक नॉनव्हेज अन्न आहे. इराणच्या कॅस्पियन सागरात एल्बिनो स्टर्जन नावाचा एका मासा सापडतो. याच माशाच्या अंड्यांपासून हा खाद्यपदार्थ तयार केला जातो. या माशाच्या अंड्यापासून तयार केलेल्या या खाद्यपदार्थाची किंमत 34500 डॉलर्स प्रतिकिलो असते. 24 कॅरेट सोन्याच्या डब्ब्यात हा खाद्यपदार्थ दिला जातो.

जपानमधील वाग्यू बीफदेखील असेच महागडे आहे. या प्राण्याला खूप कठोर नियमांचे पालून करून वाढवले जाते. त्यामुळेच या प्राण्याचे मांस खूपच महाग असते. या प्राण्याचे मास 500 ते 600 डॉलर्स प्रति किलोने विकले जाते. या प्राण्याचे मांस खूपच पौष्टीक असल्याचेही सांगितले जाते.

इंडोनेशियामध्ये अयाम सेमानी नावाची दुर्मिळ कोंबडी मिळते. या कोंबडीची त्वचा, पंख, मांस सगळे काळ्या रंगाचे असते. या कोंबडीचे मांस शरीरासाठी खूपच पौष्टीक असल्याचे सांगितले जाते. म्हणूनच या कोंडबीच्या मांसाची किंमत दीड हजार डॉलर्स प्रति किलो आहे. या कोंबडीच्या मांसाची खूप मागणी असते.

जपानमध्ये ब्लुफिन टुना नावाचा खास मासा आढळतो. या माशाचे मांस ओटोरे नावाने ओळखले जाते. या प्रसिद्ध माशाचा लिलाव केला जातो. लिलावामध्ये हे मासे लाखो रुपयांना विकले जातात. या माशांची किंमत पाच हजार डॉलर्स प्रति किलो असते. हा मासादेखील आरोग्यासाठी खूपच चांगला असतो, असे सांगितले जाते.