
अभिनेत्री तमन्ना भाटिया ही आयटम साँगसाठी सध्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री ठरली आहे. 'आज की रात', 'कावाला', 'गाफूर' यांसारख्या तिच्या गाण्यांनी अक्षरश: धुमाकूळ घालता आहे. तमन्नाने न्यू इअर सेलिब्रेशनच्या कार्यक्रमात 6 मिनिटं परफॉर्म करण्यासाठी सहा कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

अभिनेत्री नोरा फतेही तिच्या बेली डान्ससाठी लोकप्रिय आहे. नोराचेही अनेक आयटम साँग्स सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असतात. एका गाण्यासाठी ती जवळपास दोन कोटी रुपये मानधन स्वीकारते. नाच मेरी रानी, दिलबर यांसारखी तिची गाणी हिट ठरली आहेत.

अभिनेत्री सनी लिओनीचं बेबी डॉल हे आयटम साँग तुफान गाजलं होतं. त्याचसोबत देसी लूक, लैला मैं लैला या गाण्यांवरही तिने जबरदस्त डान्स केला आहे. सनी एका आयटम साँगसाठी तीन कोटी रुपये मानधन घेत असल्याचं कळंतय.

अभिनेत्री मलायका अरोरा आणि आयटम साँग हे समीकरण सर्वाधिक लोकप्रिय आहे. अनाकरली डिस्को चली, मुन्नी बदनाम हुईं यांसारखी तिची गाणी आजही हिट आहेत. मलायका एका गाण्यासाठी एक ते दोन कोटी रुपये फी आकारते.

अभिनेत्री करीना कपूरनेही तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये फेव्हिकॉल, हलकट जवानी, मेरा नाम मेरी है, यांसारखे आयटम साँग्स केले आहेत. यासाठी करीनाला इतरांच्या तुलनेत चांगलंच मानधन मिळतं. एका गाण्यासाठी ती पाच कोटी रुपये फी घेते.

कतरिना कैफ तिच्या दमदार डान्ससाठी ओळखली जाते. 'कमली', 'चिकनी चमेली', 'काला चश्मा' यांसारखी तिची गाणी सुपरहिट आहेत. सुरुवातीला ती 50 लाख ते 2 कोटी रुपये मानधन घ्यायची. परंतु 'धूम 3'नंतर तिने फी वाढवली. चिकनी चमेली या गाण्यासाठी तिने दोन कोटी रुपये घेतले होते.

साऊथ सुपरस्टार समंथा रुथ प्रभूने तिच्या करिअरमधील पहिलं आयटम साँग 'पुष्पा' या चित्रपटासाठी केलं होतं. यासाठी अल्लू अर्जुनने तिची मनधरणी केली होती. ऊ अंटावा हे तिचं गाणं तुफान गाजलं आणि त्यासाठी तिने पाच कोटी रुपये मानधन स्वीकारलं होतं.