
समोसा: मॉन्सून स्नॅक म्हणून सामोसा ओळखला जातो. व्हेज मसाला समोसा, मंचूरियन समोसा, चीज आणि कॉर्न समोसा, कडई पनीर समोसा इत्यादी प्रकार यात लोकप्रिय आहेत. समोसा पारंपारिक पदार्थांच्या पलीकडे जाऊन विविध फिलिंगमध्ये आढळणारा अष्टपैलू स्नॅक म्हणून विकसित झालाय. पावसाळ्यात गरमागरम समोसा खायला कुणाला आवडणार नाही?

आलू टिक्की पाव: यंदाच्या पावसाळ्यात चविष्ट स्ट्रीट फूडच्या चाहत्यांसाठी आलू टिक्की पावपेक्षा चांगले काहीच असू शकत नाही. ताज्या पावच्या मऊ बन्समध्ये असणारी कुरकुरीत आलू टिक्की आणि सोबत हिरवी आणि लाल चटणी. वाह! नक्की खा.

दही पापडी चाट: या पावसाळ्यात तुम्हाला गोड आणि चवदार असे काही तरी हवे आहे का? दही पापडी चाट हा तुमच्यासाठी मस्त पावसाळी स्नॅक आहे. ताजे दही, मसालेदार आणि गोड चटणी, चाट मसाला आणि शेव असं सगळं टाकून बनवलेली दही पापडी चाट. बघताच खावीशी वाटते.

कचोरी: या पावसाळ्यात गरमागरम चहासोबत कुरकुरीत, चकचकीत स्नॅकची ओढ आहे का? तोंडाला पाणी आणणारा मान्सूनचा पदार्थ कचोरी खा. कचोरी कुरकुरीत तळलेला स्नॅक आहे आणि चटणींबरोबर सर्व्ह केला जातो. असे काही क्षण असतात जेव्हा आपण आपल्या पाहुण्यांना काय खायला द्यायचं म्हणून गोंधळतो. कचोरी उत्तम पर्याय आहे.

मसाला पुरी: हे सगळ्यात लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. मसाला पुरीच्या प्लेटची तुलना कशासोबतच होऊ शकत नाही. प्रत्येकाला आवडणारे एक स्वादिष्ट स्ट्रीट फूड. त्यात वाळलेले वाटाणे, कुस्करलेली पापडी, थोडा चिरलेला कांदा आणि चटणी घालून बनवलेली मसाला पुरी.