चांदीचा भाव पोहोचणार थेट 250000 रुपयांवर? तज्ज्ञांच्या अंदाजाने सगळेच थक्क; भविष्यात काय होणार?
गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीचा भाव वाढत असल्याचे म्हटले जात आहे. आता चांदीचा भाव भविष्यात थेट अडीच लाखांची मजल मारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Silver Price : गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असलेले पाहायला मिळत आहे. कधी या दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत वाढते. तर कधी क्षणात या दोन्ही दाधूंची किंमत लगेच कमी होताना पाहायला मिळते. या वर्षी तर सोन्यापेक्षा चांदीच्या भावात तुफान वाढ झालेली पाहायला मिळाली. एका वर्षात चांदीचा भाव साधारण 120 टक्क्यांनी वाढला आहे. दरम्यान, आता याच चांदीचा भाव पुढच्या वर्षात थेट अडीच लाखांच्या पुढे जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
चांदीचा भाव वाढतच जाणार?
या वर्षात चांदीचा भाव साधारण 120 टक्क्यांनी वाढला. शुक्रवारी (12 डिसेंबर) देशांतर्गत बाजारात चांदीचा भाव 2 लाख रुपये प्रति किलोच्याही वर पोहोचला आहे. चांदीच्या भावाने गेल्या 46 वर्षांचा रेकॉर्ड मोडलेला आहे. 1979 सालानंतर पहिल्यांदाच चांदीचा दर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. विशेष म्हणजे भविष्यातही चांदीचा हा भाव वाढतच जाणार असल्याचे बोलले जात आहे. विश्लेषकांच्या मते चांदीची झळाळी आगामी सालात 2 लाख 40 हजार ते 2 लाख 50 हजार रुपयांपर्यंत वाढू शकते. म्हणजेच सध्याच्या भावाच्या तुलनेत पुढच्या वर्षी चांदीच्या किमतीत 25 टक्क्यांनी वाढ होऊ शकते.
अडीच लाखांच्याही पुढे भाव जाणार का?
सध्या वेगवेगळ्या क्षेत्रात सोन्याची मागणी वाढली आहे. उद्योग विश्वात तर या धातूचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. दुसरीकडे गुंतवणूक म्हणूनही लोक चांदीकडे पाहात आहेत. सौरउर्जा क्षेत्रात गेल्या चार वर्षांपासून सोन्याची मागणी चार पटींनी वाढलेली आहे. 2020 सोली सोलार क्षेत्रात चांदीची मागणी 94.4 मिलियन औंस होती. आता 2024 साली हीच मागणी 243.7 मिलियन औंसपर्यंत वाढली आहे. त्यामुळे भविष्यात सोन्याचा भाव अडीच लाखांच्या (प्रति किलो) घरात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)
