
हनुमान चालीसा प्रकरणी जामीनावर तुरुंगातून बाहेर आलेल्या खासदार नवनीत राणा लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. मानेचा व स्पॉन्डिलायटिसचा त्रास जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल झाल्या आहेत

नवनीत राणा यांना मानेच्या दुखण्यासह स्पॉन्डिलायटिसचा त्रास जाणवत असल्याने आज त्याचे MRI करण्यात आले. याच बरोबर त्याचे फुल्ल बॉडी चेकअप करण्यात आले.

तुरूंगात असतानाही नवनीत राणा यांना मानेचा त्रास जाणवत असल्याने त्यांनी जेजे रुग्णालयातून उपचार घेतले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्या लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या.

नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी रुग्णालयात त्याची भेट घेतली त्यावेळी नवनीत राणा भावूक झालेल्या दिसून आल्या होत्या. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.