
मृणाल ठाकूरने तिच्या आगामी चित्रपट जर्सीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेली पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मृणाल कोणत्याही प्रकारची कसर सोडताना दिसत नाही. नुकत्याच झालेल्या चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटसाठी काळ्या लेदर क्रिस्टल एम्ब्रॉयडरी साडी मृणालने परिधान केली आहे.

मृणाल ठाकूरने घातलेली साडी डिझायनर आनंद भूषण यांनी डिझायन केली आहे. पर्नियाच्या पॉप-अप शॉपवर ही साडी ८२ हजार रुपयाला उपलब्ध असलेली दिसून आली आहे.

या ब्लॅक साडीतील सर्व फोटोना विंटेज ओल्ड टच देण्यात आला आहे.

अभिनेता शाहिद कपूर व अभिनेत्री मृणाल ठाकूर यांच्या मोस्ट अवेटेड 'जर्सी' या 22 एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 'जर्सी' हा लोकप्रिय दक्षिण भारतीय चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. यामध्ये क्रिकेटरचा संघर्ष दाखवण्यात आला आहे.

यासाठी सर्व छात्राचित्रे काळ्या आणि पांढर्या फ्रेममध्ये क्लिक करण्यात आली आहेत. मृणालच्या या लूकने चाहत्यांच्या मनावर भूल घातली आहे. तिच्या विंटेज लूकपाहून चाहते घायाळ झाले आहेत.