
मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी हे आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देतात. विशेष म्हणजे मुकेश अंबानी यांनी तब्बल 15 किलो वजन कमी केले आहे.

रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांनी काही गोष्टी फाॅलो करून आपले वजन कमी केले आहे. मुकेश अंबानी दररोज सकाळी 5.30 वाजता उठतात आणि एक तास फास्ट चालतात.

बाकी कोणतेही वर्कआऊट ते करत नाहीत. शाकाहारी जेवण त्यामध्येही जास्तीत जास्त सलाद खाण्यावर त्यांचा भर असतो. शिवाय ज्यूस देखील ते आपल्या डाएटमध्ये घेतात.

मुकेश अंबानी यांच्या दररोजच्या जेवणात गुजराती पदार्थच असतात. विशेष म्हणजे रात्रीचे जेवण चुकूनही मुकेश अंबानी टाळत नाही, रात्रीचे जेवण ते आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत करतात.

जास्तीत जास्त हेल्दी गोष्टी खाऊन आणि सकाळी चालून मुकेश अंबानी यांनी तब्बल 15 किलो वजन कमी केले आहे. कितीही व्यस्त असले तरीही मुकेश अंबानी दररोज सकाळी चालतात.