
Diamond Power Infrastructure या कंपनीने बाजारात कमाल केली आहे. कंपनीचा शेअर 2 रुपयांहून थेट 135 रुपयांवर पोहचला आहे. अवघ्या अडीच वर्षात गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई झाली. ज्यांनी या कंपनीत गुंतवणूक केली आणि ती होल्ड करून ठेवली त्यांना मोठा फायदा झाला.

सप्टेंबर 2023 मध्ये हा शेअर 2 रुपयांच्या जवळपास होता. त्यानंतर हा शेअर घोडदौड करत राहिला. हा शेअर शुक्रवारी 135.50 रुपयांवर बंद झाला. काल या शेअरमध्ये 0.74 टक्क्यांची वाढ दिसली. तर गेल्या अडीच वर्षात या शेअरने मुसंडी मारली आहे.

दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा शेअर फायदेशीर ठरला आहे. गेल्या तीन वर्षात हा शेअर 6,750 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. या शेअरने मोठा परतावा दिला आहे. ही कंपनी ऊर्जा क्षेत्रात कार्यरत आहे. या क्षेत्रात कंपनीची चांगली घोडदौड सुरू आहे.

ऊर्जा क्षेत्रातील चांगल्या कामगिरीमुळे डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा आठ पटीने वाढून 50 कोटी इतका झाला. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा 6 कोटींच्या घरात होता. ऑपरेशन्सल महसूल 54 टक्क्यांनी वधारला. तो 474 कोटी रुपयांवर पोहचला. तर EBITDA 69 कोटींनी वाढला.

ही कंपनी 275 ग्राहकांना सेवा देते. ग्रीन एनर्जी प्रकल्पात कंपनीचा चांगली कामगिरी आहे. अदानी एनर्जी सोल्युशन्स, एल अँडी टी, बोंदाडा, राजेश पॉवर यासह काही सरकारी कंपन्यांसोबत ही कंपनी काम करते. त्यामुळे कंपनीला यावेळी तगडा नफा मिळाला आहे.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.