
भारतातील सर्वात महागडं आणि तितकंच अलिशान घर कुणाचं असेल, असा प्रश्न विचारला जातो. तेव्हा उद्योगपती मुकेश अंबानी यांचं अँटेलिया हे घर डोळ्यासमोर उभं राहातं. 27 मजल्यांच्या या घराची किंमत 12 हजार कोटीहून अधिक आहे.

दुसऱ्या क्रमांकावर आहे उद्योगपती गौतम सिंघानिया यांचं घर... रेमंड ग्रुपचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांचं 30 घर मजली घर आहे. याची किंमत सहा हजार कोटींच्या घरात आहे.

मुकेश अंबानी यांचे लहान भाऊ अनिल अंबानी यांचं घर भारतातली तिसरं सर्वाधिक महागडं घर आहे. एबोड असं या घराचं नाव आहे. 17 मजली या घराची किंमत ही पाच हजार कोटी आहे.

मुकेश अंबानी यांचे राईट हँड मानले जाणारे मनोज मोदी यांचंही अलिशान घर आहे. याची किंमत दीड हजार कोटी आहे. मनोज मोदी यांचं वृंदावन हे घर भारतातील चौथ्या क्रमांकाचं महागडं घर आहे.

उद्योगपती सायरस पूनावाला यांचंही लग्झेरिअस घर आहे. लिंकन हाऊस या त्यांच्या घराची किंमत 750 कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे.