
काल वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना झाला. या मॅचमध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने पराभवाची हॅट्ट्रिक केली. संपूर्ण सामन्यादरम्यान स्टेडियमवर एक वेगळच दृश्य दिसलं.

1 एप्रिलला सामना झाला. मुंबई इंडियन्सच्या फॅन्सनी आपल्याच टीमचा कॅप्टन हार्दिक पांड्याचा भरपूर अपमान केला. टॉसपासून ते सामना संपेपर्यंत त्याच्या विरोधात जोरदार हूटिंग, घोषणाबाजी केली.

होम टीमच्या कॅप्टनचा अशा प्रकारे अपमान होत असताना सर्वचजण हैराण होते. हे आश्चर्य स्टेडियममध्ये मॅच पहायला उपस्थित असलेल्या पूनम पांडेलाही वाटलं. ती कालचा सामना पाहायला हजर होती.

हार्दिकला अपमानित करण्यात येत होतं. त्यावेळी पूनमने जे ऐकलं. त्यावर तिला विश्वास नाही बसला. तिने एक्सवर विचारलं, वानखेडेवर मुंबई-राजस्थान सामन्यादरम्यान मला प्रेक्षकांमधून छपरी हे शब्द का ऐकू येत होते?.

छपरी हे शब्द उच्चारुन मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्माचे फॅन्स हार्दिक पांड्याला टार्गेट करत होते. पूनम पांडेसमोर हे सर्व चाललेलं. पण पूनम पांडेला हे समजत नव्हत की ते कोणाला हे बोलतायत.