
आयपीएलच्या 14 व्या मोसमाच्या रणसंग्रामाला आजपासून (9 एप्रिल) सुरुवात होत आहे. या 14 व्या हंगामातील पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात मुंबईचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डला अनोखा कारनामा करण्याची संधी आहे. पोलार्डला या सामन्यात 2 अनोखे द्विशतक आणि 1 त्रिशतक झळकावण्याची संधी आहे.

पोलार्ड

पोलार्डला 200 सिक्ससह 200 चौकार पूर्ण करण्याची संधी आहे. पोलार्डने आतापर्यंत एकूण 13 मोसमात 196 चौकार फटकावले आहेत. त्यामुळे पोलार्ड 4 चौकार लगावताच त्याच्या नावे 200 फोरची नोंद होईल.

या अष्टपैलू खेळाडूला टी 20 क्रिकेटमध्ये 300 विकेट्स घेण्याची संधी आहे. पोलार्डने आतापर्यंत एकूण टी 20 क्रिकेटमध्ये 293 फलंदाजांना बाद केलं आहे. यामुळे पोलार्ड 7 विकेट घेताच या मोसमात 300 बळी पूर्ण करेल. दरम्यान पोलार्ड सलामीच्या सामन्यात कशाप्रकारे कामगिरी करतो, याकडे सर्व मुंबईकर समर्थकांचे लक्ष असणार आहे.