
बीड जिल्ह्यातील गेवराईतील लुखामसला येथील माजी उपसरंपच यांच्या अकस्मात मृत्यूने प्रचंड खळबळ उडाली. एका नर्तिकेच्या प्रेमात वेड्या झालेल्या गोविंद बर्गेचा मृत्यू चटका लावणारा असून सध्या सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे. (photos : Social Media)

कलाकेंद्रात नृत्य करणाऱ्या पूजा गायकवाडशी ओळख झाली, त्याचे प्रेमात रुपांतर झाले. वर्षभराच्या काळात पूजाने गोविंदकडून, जमीन, सोनं नाणं, पैसे, महागडा मोबाईल अशा अनेक गोष्टी घेतल्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती गेवराईच्या घरासाठी मागे लागली होती, त्या हट्टावर कायम रहात तिने गोविंद बर्गे यांच्याशी बोलणंही बंद केलं होतं. पूजाला भेटायला गेलेल्या गोविंदचा मंगळवारी रात्री त्याच्या गाडीतच मृतदेह सापडला.

आता याप्रकरणी पोलिसांनी नर्तिका पूजा हिला अटक केली आहे. पूजाने बर्गेला ब्लॅकमेल केलं होतं, दुष्कर्म केल्याचा आरोप करून गुन्हा दाखल करेन अशा धमक्या दिल्या होत्या असाही आरोप आहे. या सर्वाला कंटाळून बर्गेने टोकाचं पाऊलस उचललं असं बोललं जात आहे.

पोलिसांनी पूजाला अटक करत बार्शी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता तिला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान गोविंद बर्गे प्रकरणात आता नवे अपडेट्स समोर आले आहेत. गोविंद यांचा मृत्यू आत्महत्या नसून त्यांच्यासोबत घातपात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

गोविंद बर्गे हे कधी साधी काठीही सोबत घ्यायचे नाहीत. मग त्यांच्याकडे पिस्तुल कुठून आलं? त्यांच्याकडे कधीही पिस्तूल नव्हतं, असा नातेवाईकांचा दावा आहे. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा गोविंदा यांचा मृतदेह दिसला, त्यांच्या कारची बॅटरी पूर्णपणे उतरलेली होती असं त्यांनी सांगितलं.

त्यामुळे ही आत्महत्या नसून यात घातपाताच संशय व्यक्त केला आहे. नर्तिका पूजाने हिने गोविंद यांना तिच्या गावी बोलावलं आणि घातपात घडवून आणला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.