Nana Patekar: 7 कोटींचा बजेट, कमावला तब्बल 457 टक्के नफा; नाना पाटेकरांच्या अभिनयाने सर्वांनाच रडवलं

हा चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवर नफा कमावणारा चित्रपट नाही, तर मराठी चित्रपटसृष्टीतील आशयघन सिनेमाचं महत्त्व अधोरेखित करणारी कलाकृती आहे. अवघ्या सात कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने कमाईचे मोठे आकडे गाठले आणि नाना पाटेकर यांच्या अभिनयातील ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली.

| Updated on: Oct 14, 2026 | 10:35 AM
1 / 5
मराठी चित्रपटसृष्टीत असे काही चित्रपट आहेत, जे प्रदर्शित झाल्यानंतर केवळ बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरत नाहीत, तर प्रेक्षकांच्या मनावरही कायमची छाप सोडतात. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या कारकिर्दीत असाच एक चित्रपट आहे, ज्याने अभिनय, भावनिक कथानक आणि बॉक्स ऑफिसवरील कमाई या तिन्ही आघाड्यांवर मोठं यश मिळवलं.

मराठी चित्रपटसृष्टीत असे काही चित्रपट आहेत, जे प्रदर्शित झाल्यानंतर केवळ बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरत नाहीत, तर प्रेक्षकांच्या मनावरही कायमची छाप सोडतात. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या कारकिर्दीत असाच एक चित्रपट आहे, ज्याने अभिनय, भावनिक कथानक आणि बॉक्स ऑफिसवरील कमाई या तिन्ही आघाड्यांवर मोठं यश मिळवलं.

2 / 5

विशेष म्हणजे, अवघ्या सात कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर तब्बल 39 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाचं नाव आहे ‘नटसम्राट’! या चित्रपटाने जवळपास 457 टक्के परतावा मिळवत मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी चित्रपटांच्या यादीत आपलं स्थान निर्माण केलं.

3 / 5

2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नटसम्राट’ या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं होतं. प्रसिद्ध मराठी नाटककार वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या अजरामर नाटकावर हा चित्रपट आधारित होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला.

4 / 5

या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर सुमारे ३९ कोटी रुपयांची कमाई केली. म्हणजेच निर्मिती खर्चाच्या तुलनेत चित्रपटाने जवळपास ३२ कोटी रुपयांची अतिरिक्त कमाई केली. याच गणनेनुसार, चित्रपटाचा परतावा सुमारे 457.14 टक्के होता. दमदार अभिनय आणि आशयघन कथानकाच्या जोरावर कमी बजेटमधील चित्रपटही मोठं यश मिळवू शकतो, हे ‘नटसम्राट’ने दाखवून दिलं.

5 / 5

या चित्रपटात नाना पाटेकर यांनी गणपतराव बेलवलकर या ज्येष्ठ रंगकर्मीची भूमिका साकारली होती. रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा हा कलाकार निवृत्तीनंतर कौटुंबिक नात्यांमधील बदल, एकाकीपणा आणि उपेक्षेचा सामना करतो. आयुष्यभर प्रेक्षकांचं प्रेम मिळवलेल्या कलाकाराला स्वतःच्या माणसांकडूनच अपेक्षित आपुलकी मिळत नाही, ही या कथानकातील वेदना प्रेक्षकांच्या मनाला भिडते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us