Nana Patekar Last Wish: मला ओल्या लाकडाने मुखाग्नि नको, फोटोला हारदेखील नको… अशी का होती नाना पाटेकरांची अखेरची इच्छा?
नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला. 75 वर्षीय नाना यांच्या निधनाचे कारण कार्डियाक अरेस्ट असल्याचे काही रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. दरम्यान, एका मुलाखतीत त्यांनी मानवी जीवनातील अंतिम सत्याबाबत तसेच अंत्यसंस्काराबाबत व्यक्त केलेली इच्छा पुन्हा चर्चेत आली असून, त्यांच्या साध्या आणि परखड स्वभावाची आठवण चाहत्यांकडून केली जात आहे. इतकेच नाही तर यावरून त्यांचे पर्यावरणावरील प्रेमही दिसून येते.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने सिनेसृष्टीसह त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली. 75 वर्षांच्या नाना पाटेकर यांचे निधन कार्डियाक अरेस्टमुळे झाल्याचे काही रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. यानंतर आता त्यांच्या जुन्या मुलाखती आणि बोलता बोलता जीवनातील अंतिम सत्याबाबत स्पष्ट सांगून टाकलं होतं.
नाना पाटेकर हे आपल्या अभिनयासोबतच साधेपणाने जीवन जगण्यासाठी आणि परखड मत मांडण्यासाठी ओळखले जात होते. त्यांचे वैयक्तिक आयुष्य असो किंवा चित्रपटसृष्टीशी संबंधित विषय, ते आपले मत स्पष्टपणे मांडत असल्याचे सांगितले जाते आणि शोबिझच्या झगमगाटापासून ते कायम दूर राहिले, अशी त्यांची प्रतिमा होती. साध्या पद्धतीने आयुष्य जगण्याला ते महत्त्व देत असल्याचे त्यांच्या मुलाखतींमधून दिसून येत असे.
आता त्यांच्या निधनाच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर, एका मुलाखतीत त्यांनी मृत्यू आणि अंत्यसंस्काराबाबत व्यक्त केलेली इच्छा पुन्हा चर्चेत आली आहे. “मुझे मृत्यु पर भरोसा है। मेने तय किया है कि मेरा अंत्यसंस्कार कोन करे" असे त्यांनी त्या मुलाखतीत सांगितले होते आणि त्यांच्या या वक्तव्याची आता पुन्हा चर्चा होत आहे. त्यांच्या या शब्दांमधून मरणाकडे पाहण्याचा त्यांचा वेगळा दृष्टिकोन समोर येत असल्याचे सांगितले जाते.
याच वेळी त्यांनी पुढे, “मुझे गीली लकड़ी में मत जलाना। वरना इससे धुंआ होगा और लोगों की आंखों में आंसू आ जाएगा,” असेही म्हटले होते. हे बोलल्यानंतर त्यांच्या डोळ्यांत अश्रू आल्याचेही सांगितले जाते आणि जीवनातील अंतिम सत्याबाबत त्यांनी व्यक्त केलेले हे परखड मत अनेकदा चर्चेत आ
दरम्यान, नाना पाटेकर गोव्यात राहत असल्याचे सांगितले जाते आणि गोव्यातील डोना पाउला येथील घरात ते बेशुद्ध अवस्थेत आढळल्याचे काही रिपोर्ट्समध्ये नमूद करण्यात आले आहे. केअरटेकरने त्यांना तातडीने रुग्णालयात नेल्याचे सांगितले जाते, मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्यानंतर गुरुवारी सकाळी 5:20 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याचेही रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.