एका कवडीत सामावली साडेतीन शक्तीपीठे, कलाकाराचं टॅलेंट पाहून व्हाल थक्क

देवीच्या अलंकारांमध्ये मानल्या जाणाऱ्या कवडीवर त्यांनी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांच्या देवींच्या प्रतिमा अतिशय कुशलतेने आणि जिवंतपणे रंगवल्या आहेत.

| Updated on: Sep 27, 2025 | 2:24 PM
1 / 6
नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नंदुरबार शहरातील चित्रकार राजेश भूपेंद्र पाटील यांनी साकारलेल्या एका खास आणि सूक्ष्म कलाकृतीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. देवीच्या अलंकारांमध्ये मानल्या जाणाऱ्या कवडीवर त्यांनी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांच्या देवींच्या प्रतिमा अतिशय कुशलतेने आणि जिवंतपणे रंगवल्या आहेत.

2 / 6
राजेश भूपेंद्र पाटील यांनी आई तुळजाभवानी, महालक्ष्मी, रेणुका माता आणि अर्धशक्तीपीठ असलेल्या साप्तशृंगी माता या देवींच्या प्रतिमा कवडीवर साकारल्या आहेत. यासोबतच त्यांनी मातेचे प्रतीक असलेले कळस, कमल, गजलक्ष्मी आणि त्रिशूल यांचेही चित्रण केले आहे.

3 / 6
'कलर्स मराठी' वाहिनीवर सुरू असलेल्या 'आई तुळजाभवानी' या मालिकेतून त्यांना ही कलाकृती साकारण्याची प्रेरणा मिळाली. यानंतर त्यांनी या प्रतिमा साकारल्या.

4 / 6
अवघ्या लहानशा कवडीवर हे सूक्ष्म चित्रण करण्यासाठी त्यांनी ऍक्रेलिक रंग, बारीक ब्रश आणि खास करून भिंगकाचेचा (मेग्निफायिंग ग्लास) वापर केला होता. एका कवडीवर मूर्ती साकारण्यासाठी त्यांना जवळपास दीड तासाचा कालावधी लागतो.

5 / 6
या कलाकृतीमागे एक पौराणिक संदर्भही आहे. पुराणकथेनुसार, रेणुका देवीने अश्रूंचा नाश करण्यासाठी कवडीत रूप घेतले होते. त्यातून बाहेर पडून तिने बालिकेचे रूप धारण केले आणि दुःखांचा नाश केला.

6 / 6
या कथेवर आधारित प्रेरणा घेऊनच पाटील यांनी ही प्रतिकृती साकारली आहे. अतिशय लहानशा कवडीवर देवींच्या प्रतिमा साकारून परंपरागत श्रद्धा आणि आधुनिक कला यांचा सुंदर संगम साधल्याबद्दल राजेश पाटील यांचे मोठे कौतुक होत आहे.