
नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात एका कारनं ट्रकला मागून जोरदार धडक दिली. यात एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकूण चार जण जखमी झाले आहे. या अपघातात कारचा चक्काचूर झालाय.

श्री क्षेत्र मढी येथून परतत असताना संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडली. बुधवारी संध्याकाळी झालेल्या या अपघातानंतर काही काळ वाहतूक खोळंबली होती. एक जण ठार तर कारमधील ती बालकांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.

अपघातात कारच्या पुढची बाजू चक्काचूर झाली होती. त्यानंतर जखमी मुलं कारच्या आतमध्ये अडकली होती. जखमी मुलांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना शर्थ करावी लागली होती. अखेर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं सर्व जखमींना बाहेर काढलंय.

या अपघातप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. तीन मुलं या भीषण अपघातातून बालंबाल बचावली आहेत. तर एकूण चार जण या अपघातात जखमी झाले होते.

नाशिक पुणे महामार्गावर सिन्नर शहराजवळ सरदवाडी बायपासवर हा अपघात झाला. या बायपासवर सीएनजी गॅसची वाहतूक करणारा एक ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. त्याला एका भरधाव कारने मागून जोरदार धडक दिली आणि हा अपघात घडला.