
नाशिक : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका महिलेवर 15 वर्षीय अल्पवयीन मुलाने एका महिलेचा विनयभंग केला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार या घटनेनंतर मुंबई नाका पोलीस ठाण्यात जमावाची मोठी गर्दी झाली होती. अगोदर पंधरा वर्षीय मुलाने चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची अफवा पसरली होती. प्रत्यक्ष मात्र कथितपणे विवाहित महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला.

आरोपांनुसार संशयित अल्पवयीन मुलाने महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महिलेकडून आरडा-ओरड करण्यात आली. या घटनेनंतर महिलेना पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावेळी तक्रारदार महिलेसह नातेवाईकांची आणि परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

मुलीसह आईवर अतिप्रसंग केल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पॉक्सोसह, विनयभंग आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आलेला नाही. पोलिसांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे सांगितले आहे. पोलीस महिलेने केलेल्या तक्रारीनुसार तपास चालू केला आहे. या प्रकरणी पुढे काय घडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.