हार्दिक पांड्यासोबत घटस्फोट… नताशा आता मुलासोबत असा घालवतेय वेळ…
भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. एक्स-वाईफ नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic) ला घटस्फोट दिल्यानंतर हार्दिक याच्या आयुष्यात नव्या महिलेची एन्ट्री झाली आहे. तर नताशा आता मुलासोबत आनंदाने आयुष्य जगत आहे.

अभिनेत्री आणि हार्दिक पांड्या याची एक्स-वाईफ नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर नताशा मुलासोबत तिच्या मायदेशी पोहोचली होती.

हार्दिक आणि नताशा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा समोर आल्यानंतर नताशा हिच्यावर अनेकांनी टीका केली. पण आता असंख्य लोक नताशा हिचं समर्थन करत आहेत. घटस्फोटानंतर नताशा आता मुलासोबत आनंदाने आयुष्य जगत आहे.

नताशा कायम मुलासोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. मुलासोबत फिरताना... त्याच्यासोबत खेळताना नताशा कायम फोटो पोस्ट करत असते. तिचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

नताशा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

घटस्फोटानंतर हार्दिक आता आयुष्यात पुढे गेला आहे आणि हार्दिकसोबत सध्या एक नवीन मॉडेल दिसत आहे. तिचे नाव माहिका शर्मा (Mahika Sharma) आहे. होय, हार्दिक पांड्या आणि मॉडेल माहिका शर्माच्या डेटिंगच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाला आहे.