
एका व्हिडीओ क्लिपमुळे अभिनेत्री प्रिया वारियर रातोरात सोशल मीडियावर हिट ठरली. तिला नेटकऱ्यांनी 'नॅशनल क्रश' ठरवलं. प्रिया वारियर तिच्या चित्रपटांमुळे नाही तर सोशल मीडियावरील फोटोंमुळे सध्या अधिक चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

प्रिया वारियरचे इन्स्टाग्रामवर 75 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. नुकतेच तिने तिच्या भटकंतीचे काही फोटो पोस्ट केले आहेत. मात्र या फोटोंमधील कपड्यांमुळे प्रियाला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

प्रिया निसर्गरम्य ठिकाणी फिरायला गेली आहे. या फोटोंमध्ये तिच्या आजूबाजूला डोंगर आणि थोडीफार हिरवळ पहायला मिळतेय. प्रियाने डेनिम शॉर्ट्स आणि त्यावर पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे. तिचा हा कॅज्युअल लूक काहींना आवडला तर काहींनी त्यावरून टीका केला आहे.

प्रियाने घातलेला पांढरा शर्ट थोडाफार पारदर्शक असल्याने नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. याआधी प्रियाचा बोल्ड अंदाज विविध फोटोंमध्ये पहायला मिळाला.

अवघ्या 26 सेकंदांच्या एका व्हिडीओमुळे प्रिया वारियर सोशल मीडिया सेन्सेशन ठरली होती. तेव्हापासूनच ती 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखली जाते. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत तिचा मोठा चाहतावर्ग आहे.