PHOTO : नवी मुंबईत व्हेंटिलेटर, डायलिसीस मशीनची तोडफोड, रुग्ण दगावल्याने नातेवाईकांचा राडा
नवी मुंबईतील महापालिकेच्या एका रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये एका मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी तोडफोड केली आहे. (Navi mumbai hospital vandalise)

- नवी मुंबईतील महापालिकेच्या एका रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये एका मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी तोडफोड केली आहे. या रुग्णालयातील व्हेंटीलेटर, डायलिसीस मशीन, पंखे तसेच इतर साहित्याची नासधूस केली आहे.
- यात रुग्णालयातील सुरक्षा रक्षकालाही मारहाण करण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्या व्यक्तींमध्ये तीन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.
- याप्रकरणी वाशी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे.
- नवी मुंबई महापालिकेतील वाशीजवळी एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 50 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णाला मंगळवारी सायंकाळी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
- त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र त्याचा रिपोर्ट आला नव्हता. पण त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र रात्री उशिरा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
- यावेळी संतप्त नातेवाईकांनी आयसोलेशन वॉर्डमध्ये जाऊन व्हेंटिलेटर, डायलिसिस मशीन, पंखे तसेच इतर साहित्यांची नासधूस केली.
- तसेच रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स यांनाही धमकी देण्यात आली. यावेळी त्यांना अडवण्यास गेलेल्या सुरक्षा रक्षकास बेदम मारहाण करण्यात आली.
- संग्रहित.








