
को-ऑर्ड सेट आजकाल खूप ट्रेंडिंग आहेत. रकुल प्रीत हिने हिरव्या रंगाचा को-ऑर्ड सेट घातलाय, तुम्ही हा ऑप्शन सुद्धा ट्राय करू शकता. प्लाझो सेट आणि त्यावर जॅकेट असा लूक उत्तम दिसतो. राकुलने यावर मोठे झुमके आणि काळा गॉगल लावलाय.

गरबा नाईटमध्ये नाचून एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही हे कॉम्बिनेशन नक्कीच ट्राय करू शकता. शॉर्ट कुर्ती आणि धोती स्टाइल स्कर्ट घालू शकता. सोनाली बेंद्रेचा हा ड्रेस बघा, लाल रंगाच्या या ड्रेसमध्ये सोनाली बेंद्रे खूप स्टनिंग दिसतेय.

indo western dress for navratra 2023

लाल रंगाचा बांधणी ड्रेस. बांधणी ड्रेस कुठल्याही कार्यक्रमात घातला तरी तो छान दिसतो, हलका आणि ट्रेडिशनल लूक देतो. हीच बांधणीच्या ड्रेसची खासियत असते. मिडी ड्रेस घातला तर तो आरामदायी वाटतो.

घागरा, लेहंगा खूप जड असतात. त्यावर ज्वेलरी, ओढणी, सगळ्या पद्धतीचे दागिने हे सगळं करत बसायचं म्हणजे ते खूप हेवी ठरतं. त्या ऐवजी तुम्ही हलका ड्रेस घालू शकता. क्रॉप टॉप आणि खाली लॉंग स्कर्ट घाला. यावर डान्स पण करता येतो. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ओढणी सुद्धा यावर घेऊ शकता.