Navratri 2026 : घटस्थापनेसाठी सकाळी किती वाजेपर्यंत शुभ मुहूर्त? जाणून घ्या अचूक वेळ
यंदा रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. या दिवशी घटस्थापना करण्यासाठी सकाळी कोणता शुभ मुहूर्त सांगितला आहे, हेच आपण जाणून घेणार आहोत. तसेच सकाळच्या वेळेत घटस्थापना करणे शक्य नसेल, तर अभिजित मुहूर्ताचाही पर्याय उपलब्ध आहे. अभिजित मुहूर्ताची वेळ, घटस्थापनेची तारीख आणि पूजेपूर्वी लक्षात घ्यायच्या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्यायचं असेल तर बातमी पुढे वाचा.

यंदाच्या नवरात्रीतला घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे? चला जाणून घेऊयात, यंदा ११ ऑक्टोबरला शारदीय नवरात्रीची सुरुवात होत आहे. आणि घटस्थापना जी करायची आहे त्यासाठी जो शुभ मुहूर्त आहे त्याबद्दलच जाणून घेणार आहोत.
रविवार ११ ऑक्टोबरला सकाळी ६.१९ मिनिटांपासून ते १०.१२ मिनिटांपर्यंत आहे.
आता तुमच्यापैकी काहींना ह्या शुभ मुहूर्तावर घटस्थापना करायला जमणार नसेल तर अजून एक शुभ मुहूर्त आहे. जो अभिजित मुहूर्त आहे. त्या वेळात सुद्धा तुम्ही घटस्थापना करू शकता.
तो अभिजित मुहूर्त आहे सकाळी ११.४४ ते दुपारी १२.३१ मिनिटांपर्यंत. या मुहूर्तावर देखील तुम्ही घटस्थापना करू शकता.
आता अर्थात या शुभ मुहूर्तामध्ये तुमच्या शहरानुसार थोडाफार फरक पडू शकतो, आता थोडाफार फरक म्हणजे पाच/ दहा मिनिटे इकडे- तिकडे फार असा मोठा फरक नाही. डिस्क्लेमर: साधारण पंचांगानुसार जो शुभ मुहूर्त आहे तो इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.