
गायिका नेहा कक्कर आणि पंजाबी गायक रोहन प्रीत विवाह बंधनात अडकले आहेत.

नेहा आणि रोहानप्रीतच्या लग्नाचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मेंदी, हळद, रोका या सगळ्या कार्यक्रमांचे फोटो नेहा आणि रोहनप्रीतने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे.

गेले अनेक दिवस नेहा कक्कर आणि रोहनप्रीतच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती.

रोका सेरेमनीनंतर त्यांचे नवे गाणे ‘नेहू दा व्याह’ प्रदर्शित झाले होते.

या गाण्यानंतर नेहा खरंच लग्न करणार आहे की केवळ गाण्याचे चित्रीकरण होते, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता.

मात्र, आता दोघांचे ‘ग्रँड वेडिंग’ पार पडले आहे. गुरुद्वारामध्ये दोघांनी सात फेरे घेत, एकमेकांना साताजन्माची वचने दिली आहेत.

लग्नानंतरचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात नेहा आणि रोहानप्रीत यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे.