
नेहा कक्कर आणि पंजाबी गायक रोहनप्रीत आता 'द कपिल शर्मा' शोमध्ये हजेरी लावणार आहेत.

नेहा कक्करनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वी नेहा आणि रोहनप्रीत लग्नबंधनात अडकले आहेत.

या दोघांच्या लग्नाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

खूप कमी वेळात या दोघांच्या जोडीनं लोकांची मनं जिंकली. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना भरपूर प्रेम मिळत आहे.