IPO Update : पैशांचा पडणार पाऊस, 3 बडे IPO आले, वाचा ग्रे मार्केटमध्ये काय भाव?
Kanohar Electricals IPO- हा आयपीओ 8 सप्टेंबर रोजी खुला होणार आहे. गुंतवणूकदार 10 सप्टेंबर रोजीपर्यंत गुंतवणूक करू शकतात. या आयपीओचा किंमत पट्टा 601 रुपये ते 632 रुपये आहे.

या आठवड्यात अनेक बड्या कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. यातील अनेक कंपन्यांचे आयपीओ ग्रे मार्केटमध्ये चांगल्या स्थितीत आहेत. काही कंपन्यांचा जीएमपी तर 100 रुपयांपेक्षाही जास्त आहे. हे आयपीओ कोणते आहेत, ते जाणून घेऊ या..
प्रणव कंस्ट्रक्शन आयपीओ (Pranav Constructions IPO)- या कंपनीचा आयपीओ 351.03 कोटी रुपयांचा आहे. हा आयपीओ गुंतवणुकीसाठी 7 सप्टेंबर रोजी खुला होणार आहे. या आयपीओचा किंमत पट्टा 118 रुपये ते 124 रुपये आहे. गुंतवणूकदारांना या आयपीओत एका लॉटमध्ये 120 शेअर मिळतील. या आयपीओचा जीएमपी सध्या 43 रुपयांवर आहे.
Kanohar Electricals IPO- हा आयपीओ 8 सप्टेंबर रोजी खुला होणार आहे. गुंतवणूकदार 10 सप्टेंबर रोजीपर्यंत गुंतवणूक करू शकतात. या आयपीओचा किंमत पट्टा 601 रुपये ते 632 रुपये आहे. एका लॉटमध्ये तुम्हाला 23 शेअर मिलतील. ग्रे मार्केटमध्ये हा आयपीओ 205 रुपयांवर ट्रेड करतोय.
Prasol Chemicals IPO- या आयपीओचा जीएमपी सध्या 115 रुपये आहे. या आयपीओवर 17 टक्के लिस्टिंग गेन मिळू शकतात. 8 ते 10 सप्टेंबर या काळात तुम्हाला या आयपीओमध्ये गुंतवणूक करता येईल. या आयपीओचा एक लॉट 22 शेअरचा असून किंमत पट्टा 643 रुपये ते 676 आहे.
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)