
PSL 11 : पाकिस्तान सुपर लीगचा 11 वा सीजन सुरु होण्याआधी न्यूझीलंडचे बॉलिंग कोच जेकब ओरम यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ते इस्लामाबाद यूनायटेडमध्ये सहभागी झाले आहेत. जेकब ओरम इस्लामाबाद यूनायटेडचे सहाय्यक कोच असतील. (फोटो-GETTY IMAGES)

जेकब ओरम सध्या भारतात न्यूजीलंड टीम सोबत आहेत. ते टीमचे बॉलिंग कोच आहेत. पण ते आता पाकिस्तानात आपली क्षमता दाखवून देणार आहेत. या न्यूझीलंडच्या माजी क्रिकेटपटूकडे कोचिंगचा दीर्घ अनुभव आहे.(फोटो-GETTY IMAGES)

जेकब ओरम यांच्या कोचिंग करिअरची सुरुवात वर्ष 2014 मध्ये झालेली. ते न्यूजीलंड ए टीमचे बॉलिंग कोच बनले. 2018 ते 2021 पर्यंत ते न्यूजीलंड महिला टीमचे बॉलिंग कोच आणि असिस्टेंट कोच राहिले. 2023-24 मध्ये न्यूजीलंड पुरुष टीमचे बॉलिंग कोच बनले. वर्ष 2024 पर्यंत ते टीमशी संबंधित होते. त्यानंतर ते टीमचे सीनियर बॉलिंग कोच बनले. (फोटो-GETTY IMAGES)

न्यूजीलंड डोमेस्टिक सर्किटमध्ये जेकब ओरम यांनी सेंट्रल ड्रिस्ट्रिक्ट्सला कोचिंग दिली आहे. सोबतच ते अबु धाबी टी10 मध्ये नॉर्दर्न वॉरियर्स आणि SA20 मध्ये मुंबई इंडियन्स केपटाऊनचे बॉलिंग कोच होते. ओरम पहिल्यांदा पीएसएल टीमची कोचिंग करताना दिसणार आहेत. (फोटो-GETTY IMAGES)

जेकब ओरम न्यूजीलंडसाठी 33 टेस्ट आणि 160 वनडे मॅच खेळला आहे. सोबतच 36 टी20 इंटरनॅशनल सामनेही न्यूझीलंडकडून खेळले आहेत. ओरमच्या नावावर 6 इंटरनॅशनल सेंचुरी शिवाय 252 विकेट आहेत. (फोटो-PTI)