
न्यूझीलंडमधील खासदार लॉरा मॅक्लूर यांची जगभरात चर्चा होत आहे. इंटरनेटचं जग सामान्यांसाठी किती असुरक्षित आहे, हे सांगण्याचं धाडस त्यांनी केलंय.

त्यांनी संसदेत चक्के स्वत:चाच एक एआय जनरेटेड नग्न फोटो दाखवला. त्यांच्या याच कृत्याची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.

संसदेत त्यांनी हा एआय जनरेटेड नग्न पोटो दाखवताना हा माझा नग्न फोटो आहे, पण हा खरा नाही. एआय जनरेडेट आहे, असं त्यांनी सांगितलं.

त्यांनी डीपफेक तंत्रज्ञानाचे धोकेही यावेळी सांगितले. पीडित महिलांसाठी अशा प्रकारचे फोटो हे अपमानजनक आणि धक्कादायक आहेत. या फोटोमधील महिला मी नाही हे माहीत असूनही संसदेत अशा प्रकारचा फोटो दाखवणंदेखील मला फार भयावह वाटलं आहे, असं त्यांनी संसदेत बोलून दाखवलं.

त्यांनी हा सर्व प्रकार आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर सांगितला आहे. तंत्रज्ञान चुकीचे नाही. मात्र मात्र त्याचा दुरुपयोग करणे चुकीचे आहे. यामुळे लोकांना नुकसान झालेले आहे. आपल्या कायद्यात यासाठी ठोस पावलं उचलली पाहिजेत, असं मत त्यांनी व्यक्त केले आहे.