भारतातील एकमेव राज्य, जिथे एक रुपयाही भरावा लागत नाही टॅक्स

आज आपण भारतातील अशा राज्याची माहिती जाणून घेणार आहोत, जिथे करात पूर्णपणे सूट दिली म्हणजे एक रुपयाही कर भरावा लागत नाही.

बापू गायकवाड | Updated on: Jun 29, 2025 | 6:10 PM
1 / 5
आयकर विभागाने आयकर भरण्याची तारीख 15 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे नागरिकांना आयकर भरण्यासाठी जास्त वेळ मिलाला आहे. याद्वारे लोक त्यांच्या उत्पन्नाची माहिती आयकर विभागाला देत असतात.

आयकर विभागाने आयकर भरण्याची तारीख 15 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे नागरिकांना आयकर भरण्यासाठी जास्त वेळ मिलाला आहे. याद्वारे लोक त्यांच्या उत्पन्नाची माहिती आयकर विभागाला देत असतात.

2 / 5

तुम्हाला माहिती आहे का की, भारतात असे एक राज्य आहे जिथे कोणत्याही प्रकारच्या उत्पन्नावर शून्य कर आकारला जातो. या राज्याचे नाव सिक्कीम आहे. इथे कोणताही कर भरावा लागत नाही.

3 / 5

सिक्कीममधील मूळ रहिवाशांना संविधानाच्या कलम 371 (एफ) आणि आयकर कायद्याच्या कलम 10 (26एएए) अंतर्गत आयकरातून सूट देण्यात आली आहे. 1975 मध्ये सिक्कीम भारतात सामीस झाले, त्यावेळी सिक्कीमचे स्वतःचे प्रशासकीय आणि कर नियम होते. ज्यात भारत सरकारने कोणताही बदल केला नाही.

4 / 5

कलम 10 (26एएए) नुसार सिक्कीममधील मूळ रहिवाशांच्या उत्पन्नावर म्हणजे, पगार, व्यवसाय, शेअर्समधून मिळणारा नफा, व्याज किंवा गुंतवणूक यावर कोणताही कर आकारला जात नाही. त्यामुळे हे भारतातील इतर राज्यांपेक्षा वेगळे राज्य बनते.

5 / 5

नियमानुसार, फक्त 1961 च्या सिक्कीम विषय नियमनात नोंदणीकृत आणि त्या वेळी नोंदणीकृत लोकांचे वंशज असलेल्यांनाच करात सूट दिली जाते. नवीन लोकांना किंवा बाहेरून येणाऱ्या लोकांना मात्र करात सूट मिळत नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us