रेल्वेने आधुनिक तंत्रज्ञानाने वाचवले 255 हत्तींचे प्राण, हत्तींना रोखण्यासाठी ‘Plan Bee’ ही सज्ज

नॉर्थ-ईस्ट फ्रंटियर रेल्वेने आधुनिक एआय तंत्रज्ञानावर आधारित अलर्ट करणारी यंत्रणा वापरुन गेल्या जानेवारी ते सप्टेंबर 2026 अशा नऊ महिन्यात जवळपास 255 हत्तींचे प्राण वाचवण्यात यश मिळवले आहे.

| Updated on: Oct 06, 2026 | 9:07 PM
1 / 5
एनएफआरने रेल्वे रुळांजवळील हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवणारी एआय-आधारित प्रणाली विकसित केली आहे. एनएफआरने अवलंबलेल्या प्रमुख उपायांपैकी एक म्हणजे डिस्ट्रिब्युटेड अकूस्टिक सिस्टीम (डीएएस) तंत्रज्ञानाचा वापर होय. ही एआय-आधारित घुसखोरी शोध प्रणाली (आयडीएस) हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवते.

2 / 5

नव्या AI तंत्रज्ञानाने हत्ती आल्याचा अलर्ट रेल्वेला, वनखाते आणि संबंधित यंत्रणांना जातो. त्यामुळे हत्तींचा मोठा कळप आल्यास रेल्वे गाड्यांना नियंत्रित केले जाते. या २५५ हत्तींपैकी १०६ हत्तींना पश्चिम बंगाल येथील अलिपूरदौर डिव्हीजनमध्ये वाचवण्यात यश आले आहे. तर रांगिया येथे १४, लुमडिंग येथे १२२ आणि आसामच्या तिन्सुखिया डिव्हीजनमध्ये १५ हत्तींना वाचवण्यात यश आले आहे. रेल्वेने हत्तींचा संचार होणारे संवेदनशील स्पॉट निश्चित केले आहेत.

3 / 5

4 / 5

रेल्वे रुळांजवळ हत्तींची हालचाल आढळल्यास ही प्रणाली तात्काळ अलर्ट देऊ शकते, ज्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना वेळेवर कारवाई करता येते आणि आवश्यकतेनुसार रेल्वेगाड्यांची वाहतूक नियंत्रित करता येते.

5 / 5

elephantप्लान बी काय ? - नॉर्थ-ईस्ट फ्रंटियर रेल्वेने हत्तींना रोखणारा प्लान बी देखील सक्रीय केला आहे. यात हत्तींना रेल्वे रुळांपासून दूर करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा मधमाशांचा आवाज निर्माण करणारा सायरन वाजवला जातो. त्यामुळे हत्ती रुळांकडे फिरकत नाहीत. तसेच हत्तींना रेल्वे रुळ ओलांडावे लागू नयेत यासाठी अंडरपास देखील तयार करण्यात आले आहेत. तसेच रुळांच्या कडेला हत्तींना आवडणारे कोणतेही खाद्य पदार्थ आढळू नयेत अशीही काळजी घेतली जाते. Cross the track

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us