
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता अजय देवगण देखील एका लक्झरी रोल्स रॉयसचा मालक आहे. त्याच्याकडे रोल्स रॉयस कलिनन कार आहे. जगातील सर्वात महागड्या एसयूव्हीमध्ये तिचा समावेश आहे. त्याची किंमत जवळपास 6.9 कोटी रुपये आहे.

बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशनलाही रोल्स रॉयसचे वेड लागले आहे. आगामी क्रिश ४ या चित्रपटात हृतिक पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. हृतिककडे रोल्स रॉयस घोस्ट सीरीज II कार आहे, ज्याची किंमत सुमारे 7 कोटी रुपये आहे.

संजू नावाने प्रसिद्ध असलेला संजय दत्त सुद्धा रोल्स रॉयसचा जुना चाहता आहे. संजयच्या कार कलेक्शनमध्ये अनेक आलिशान गाड्यांचा समावेश आहे, पण रोल्स रॉयस घोस्ट वेगळा आहे. या लक्झरी कारची किंमत जवळपास 8.3 कोटी रुपये आहे.

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारकडेही एक आलिशान रोल्स रॉयस कार आहे. Rolls Royce Phantom ने अक्षयच्या कार कलेक्शनच्या सौंदर्यात भर घातली आहे. या रोल्स रॉयस कारची किंमत अंदाजे 10.2 कोटी रुपये आहे.

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानकडे रोल्स रॉयस नाही हे कसे शक्य आहे? किंग खानकडे रोल्स रॉयस कुलीनन ब्लॅक कार आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, काळ्या रंगाच्या Rolls Royce Cullinan ची किंमत 11.3 कोटी रुपये आहे.

आता बोलूया त्या अभिनेत्याबद्दल ज्याने बॉलिवूडमधील सर्वात महागडी रोल्स रॉयस खरेदी केली. हा दुसरा कोणी नसून इमरान हाश्मी आहे. इम्रानकडे रोल्स रॉयस घोस्ट ब्लॅक कार आहे, ज्याची किंमत 12.2 कोटी रुपये आहे.