
महशिवरात्री निमित्ताने नाशिकच्या नांदगावमधील सुप्रसिद्ध असलेल्या नांदेश्वर मंदिरात आज भाविकांनी पहाटे पासूनच दर्शनासाठी गर्दी केली.

ओम नःम शिवाय, शिव हर शंकर, नमामी शंकरच्या गजरात व भक्तिमय वातावरणात दुग्धाभिषेक, महापूजा करण्यात आली.

भाविकांनी मंदिर परिसरात शिस्तीचे पालन करत भोले शंकराचे दर्शन घेतले.

मंदिर परिसरात बेल, फुले, नारळ आदींची दुकाने थाटली होती.

महाशिवरात्री म्हणजे भाविकांसाठी एक पर्वणीच असते.

नांदेश्र्वर मंदिर असंख्य फुलांनी आज सजले होते..मंदिर परिसरात काढलेली भगवान शंकरांची रांगोळी भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.