
दात एकदा खराब झाले की त्यामुळे होणारा त्रास फारच वेदनादायी असतो. हा त्रास कधीकधी असह्य होतो. त्यामुळेच दातांची योग्य निगा राखणे फार गरजेचे असते. अनेकदा जीवनस्त्त्वांच्या कमतरतेमुळे दात खराब होतात.

दात पिवळे पडण्याची समस्या तर अनेकांचा पिच्छा सोडत नाही. एकदा दात पिवळे व्हायला लागले की ते विचित्र दिसायला लागतात. त्यामुळेच दात पिवळे का होतात, असे नेहमीच विचारले जाते. दात पिवळे होण्याचा संबंध हा ड जीवनसत्त्वाशी आहे.

तुमच्या शरीरात ड जीवनसत्त्वाची कमतरता असेल तर दात पिवळे होऊ शकतात. ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे दातांचे इनॅमलही कमी कमजोर होऊ शकते. इनॅमल कमी झाल्यामुळेच दाताच्या मुळाशी असलेले पिवळे डेंटिन जास्त दिसायला लागते आणि दातांचा पिवळा रंग दिसायला लागतो.

ड जीवनसत्त्वाची कमतरता भासल्यास दूध आणि दही प्यायला हवे. यात ड जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असते. ड जीवनसत्त्व हवे असेल तर तुम्ही मासेही खाऊ शकता. पलक, मशरुम खाल्ल्याने ड जीवनसत्त्व मिळते.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)