
2022 मध्ये नेटफ्लिक्सवर 'वेडन्स्डे' ही कॉमिक सुपरनॅच्युरल थ्रिलर सीरिज प्रदर्शित झाली होती. यामध्ये जेना ऑर्टेगाने दमदार भूमिका साकारली होती. या सीरिजचा दुसरा सिझनसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्यालाही उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे.

'स्ट्रेंजर थिंग्स' ही नेटफ्लिक्सवरील फँटसी सीरिज आहे. आतापर्यंत या सीरिजचे चार सिझन्स प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या चारही सिझन्सना लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत.

'अडॉलसन्स' या वेब सीरिजलाही प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये एका किशोरवयीन मुलाची कथा दाखवण्यात आली आहे. यात मुख्य भूमिका साकारणाऱ्या 15 वर्षीय अभिनेत्याला 'इमी' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

'द नाइट एजंट'चा पहिला सिझन चांगलाच धमाकेदार होता. आतापर्यंत या सीरिजचे दोन सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या सीरिजची कथा अमेरिकी एफबीआय एजंट पीटर सदरलँडभोवती फिरते. यातील ट्विस्ट अँड टर्न्स भन्नाट आहेत.

'डामर : मॉन्स्टर : द जेमरी डामर स्टोरी' ही सत्यघटनेवर आधारित सीरिअल किलरची कहाणी आहे, जो आधी त्याच्या शिकाऱ्यांची हत्या करतो आणि मग त्यांचे अवयव खातो. असं करण्यामागचं कारण काय आहे, हे सीरिजमध्ये पहायला मिळतं.

'नेटफ्लिक्स'च्या 'ब्रिजर्टन' या लोकप्रिय सीरिजचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. आतापर्यंत या सीरिजचे तीन सिझन्स प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तर चौथ्या सिझनचा प्रीमिअर पुढच्या वर्षी जून महिन्यात होणार आहे.

'फूल मी वन्स' या नावाच्या पुस्तकावर आधारित ही सीरिज आहे. याची कथा माया नावाच्या महिलेच्या अवतीभवती फिरते. जिच्या पती आणि बहिणीची हत्या झालेली असते. जशजशी याची कथा पुढे सरकते, तसतसे त्यात ट्विस्ट पहायला मिळतात.