लग्न जमताच त्याचा जाच वाढला, धमक्यांना कंटाळून 18 वर्षीय तरुणीनं मृत्यूला कवटाळलं; जालन्यात काय घडलं?

| Updated on: Apr 22, 2025 | 8:21 PM
1 / 5
लग्न जमताच त्याचा जाच वाढला, धमक्यांना कंटाळून 18 वर्षीय तरुणीनं मृत्यूला कवटाळलं; जालन्यात काय घडलं?

2 / 5
जालन्यातील भोकरदन पोलीस स्टेशन मध्ये आरोपी प्रियकर सह 5 जनाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.

3 / 5
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील फत्तेपूर गावामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. येते एका 18 वर्षीय तरुणीने प्रियकराच्या बदनामीच्या धमकीला कंटाळून आत्महत्या केली आहे.

4 / 5
विशेष म्हणजे या तरुणीचा मृतदेह हा तिच्या प्रियकराच्या घरी आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भोकरदन पोलिसांनी आरोपी विशाल आघाम यासह 5 जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे .या प्रकरणात आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

5 / 5
दरम्यान या प्रकरणात दिलेल्या फिर्यादीमध्ये असे म्हटले आहे की, आरोपी प्रियकर विशाल आघाम आणि मयत तरुणीचे मैत्रीपूर्ण संबंध होते. परंतु या मुलीचे नुकतेच दुसऱ्या मुलासोबत लग्न ठरल्याने हाच राग मनात धरून विशालने तिला जीवे मारण्याची आणि समाजामध्ये बदनाम करण्याची धमकी दिली होती.