बेडरुम, किचन अन् 18 खिडक्या, या महिला नेत्याच्या प्रायव्हेट जेटची जगभरात चर्चा; किंमत वाचून थक्क व्हाल!

पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ यांच्या कथित प्रायव्हेट जेटची सगळीकडे चर्चा होत आहे. त्यांच्या या जेटमध्ये असलेली सुविधा आणि त्याची किंमत समजताच अनेकजण थक्क होत आहेत.

| Updated on: Feb 19, 2026 | 7:43 PM
1 / 5
पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात सध्या एका विमानाची सगळीकडे चर्चा होत आहे. पाकिस्तानच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्याकडे Gulfstream G500 नावाचे एक प्रायव्हेट जेट आहे. या जेटची निर्मिती 2019 साली करण्यात आली होती. याच प्रायव्हेट जेटची किंमत पाहून सगळेच अवाक होत आहेत.

पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात सध्या एका विमानाची सगळीकडे चर्चा होत आहे. पाकिस्तानच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्याकडे Gulfstream G500 नावाचे एक प्रायव्हेट जेट आहे. या जेटची निर्मिती 2019 साली करण्यात आली होती. याच प्रायव्हेट जेटची किंमत पाहून सगळेच अवाक होत आहेत.

2 / 5

याच प्रायव्हेट जेटची किंमत पाहून सगळेच अवाक होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या प्रायव्हेट जेटची किंमत 10 अब्ज रुपये आहे. हे विमान अगोदर अमेरिकेत होते. अमेरिकेतील व्हिआयपी, उच्चपदस्थ कॉर्पोरेट सीईओ, राष्ट्राध्यक्ष या विमानाचा वापर करायचे.

3 / 5

अमेरिकेतही हे विमान एवढे प्रसिद्ध असेल तर त्यात नेमके काय आहे, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. या प्रायव्हेट जेटची किंमत तब्बल 38 ते 42 मिलियन डॉलर्स असल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानी रुपयांत सांगायचे झाल्यास त्याची किंमत 10 अब्ज रुपये आहे.

4 / 5

या प्रायव्हेट जाटचा आतील भाग पाहून भलेभले थक्क झाले आहेत. त्याचे इंटेरियर कस्टमाईज्ड आहे. या विमानात एकाच वेळी 19 लोक प्रवास करू शकतात. तसेच आठ लोकांना झोपण्याचीसुद्धा या विमानात सोय करण्यात आलेली आहे.

5 / 5

या विमानात मऊशार आसने, मिटिंग, जेवणासाठी वेगळी जागा, किचन, मनोरंजनासाठी वेगळी खोली, अशी व्यवस्था आहे. या विमानाला एकूण 14 खिडक्या आहेत. या विमानात नेहमी ताजी हवा येईल, असा पद्धतीने त्याची रचना करण्यात आलेली आहे. म्हणूनच हे विमान सर्वांपेक्षा वेगळे असून त्याची चर्चा होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us