
शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचा घटस्फोट झाला. दोघांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा झालेली पाहायला मिळाली. भारताच्या सूनबाईंना पाकिस्तानी अजून विसरलेले नाहीत. सना जावेद हिची भर सामन्यात चाहत्यांनी मजा घेतलेली पाहायला मिळाली.

पाकिस्तान प्रीमीअर लीगमधील सामन्याध्ये शोएब याची नवी पत्नी सना जावेद आली होती. सामना पाहत असताना तिला पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांनी तिला डिवचलं.

कराची किंग्स या संघाकडून शोएब मलिक खेळतो. सामना सुरू असताना सनाला सानिया मिर्झा हिच्या नाव घेत चाहते चिडवत होते.

भर सामन्यात सनाला चाहत्यांनी निशाण्यावर घेतलं होतं. चाहते तिला चिडवत असताना तिने रागाने त्यांच्याकडे पाहिलंसुद्धा मात्र तरीही चाहते चिडवायचे काही थांबले नाहीत.

शोएब मलिक आणि सानिया मिर्झा या दोघांचा घटस्फोट झाला असला तरी चाहते मात्र दोघांना काही विसरले नाहीत. नवीन वहिनी काही चाहत्यांना आवडलेली दिसत नाहीय.