
केंद्र सरकारने प्रत्येकाने आपले पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक करणे अनिवार्य असल्याचे याआधीच सांगितलेले आहे. पॅन कार्ड आधार कार्डला जोडलेले नसेल तर तुम्हाला अनेक अडचणींचा समाना करावा लागू शकतो.

पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 आहे. या कालावधित पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांस न जोडल्यास 1 जानेवारी 2026 पासून तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय होण्याची शक्यता आहे.

TaxBuddy या टॅक्स भरण्यास मदत करणाऱ्या संकेतस्थळाच्या माहितीनुसार तुमचे पॅन कार्ड निष्क्रीय झाल्यास तुम्हाला आयटीआर भरता येणार नाही. तसेच एसआयपी करण्यासही तुम्हाला अडचणी येऊ शकतात.

आधार आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक कसे करायचे, हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. मात्र प्राप्तिकर विभागाच्या e-filing पोर्टलवर त्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. अगदी सोप्या आणि साध्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक करू शकता.

आधार कार्ड-पॅन कार्ड एकमेकांशी लिंक नसतील तर तुम्हाला आयटीआर भरता येणार नाही, कर परतावा मिळणार नाही, Form 26AS वक TDS/TCS माहिती दिसणार नाही. पॅन-आधार लिंक केल्यानंतर या सर्व सुविधा चालू होतील.