
महिला गर्भवती असताना आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे असे सांगितले जाते. विशेष म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये असा सल्ला तर नेहमीच दिला जातो. प्रेग्नेंसीमध्ये पॅरासिटामोल ही गोळीदेखील घेऊन ये, असे म्हटले जाते.

प्रेग्नेन्सी आणि पॅरासिटामोल याबाबत अनेक दावे-प्रतिदावे केले जातात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील गर्भवती महिलांनी पॅरासिटामोल औषध घेऊ नये असा सल्ला दिला होता. त्यामुळेच हे औषध खरंच गर्भवती महिलांसाठी धोकादायक असते? असे नेहमी विचारले जात होते. आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.

मेडिकल जर्नल he Lancet ने एक रिव्ह्यू प्रकाशित केला आहे. या लेखानुसार गर्भवती असताना महिलेने ऑटिझम, एडीएचडी, आर्टिफिशियल डिसअॅबिलिटी या आजारांचा धोका वाडथ नाही. सध्याच्या अभ्यासानुसार पॅरासिटामोलमुळे आईच्या पोटात असलेल्या बाळावर परिणाम होतो, असे सिद्ध होऊ शकलेले नाही.

सध्याच्या गाईडलाईन्सनुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गर्भवती महिलेने पॅरासिटामोल हे औषध घेतले तर ते सुरक्षित असते. बाळावर कोणताही परिणाम होत नाही. ताप आला की अजूनही हे औषध घेतले जाते.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)