टीम इंडिया मॅनेजमेंटमध्ये बदल होणार, दंगलीच्या काळात जन्मलेल्या खेळाडूकडे सर्वात मोठी जबाबदारी?

अजित आगरकर यांच्या कार्यकाळानंतर भारतीय संघाचा मुख्य निवडकर्ता म्हणून कोणाची निवड होणार याची चर्चा सुरु आहे. यामध्येच आता नवी माहिती समोर आली आहे.

| Updated on: Sep 17, 2026 | 7:50 PM
1 / 5
पुढच्या महिन्यामध्ये मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचा कार्यकाळ पुढील महिन्यामध्ये संपत आहे. त्यांच्याजागी माजी विकेटकीपर आणि फलंदाज पार्थिव पटेलची निवड होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. प्रज्ञान ओझा यांचं नावही या शर्यतीमध्ये समोर आलं आहे. (Photo: PTI)

2 / 5

पार्थिव भारतासाठी 25 कसोटी सामने खेळले आहेत. 38 एकदिवसीय आणि दोन टी 20 सामने खेळला आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 30 शतकं आहेत. आयपीएलबद्दल बोलायचे झाल्यास तो सहा संघांकडून तब्बल 139 सामने खेळला आहे.

3 / 5

पार्थिवने 2002मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. हनीफ मोहम्मदचा विक्रम त्याने मोडून तो तेव्हा इतिहासातील सर्वात तरुण विकेटकिपर बनला होता. तेव्हा पटेलचे वय केवळ 17 वर्ष 153 दिवसांचे होतेय

4 / 5

दरम्यान, पार्थिवबद्दल अनेकांना माहिती नाही की तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सलग पाच शतक झळकावणारा पहिला भारतीय क्रिकेटर आहे. त्याने हा विक्रम 2007मध्ये केला होता.

5 / 5

पार्थिवच्या जन्माची गोष्टही खूप रंजक आहे. 1985मध्ये त्याचा जन्म अहमदाबादमधील दंगली आणि संचारबंदीच्या काळात झालेला. पार्थिवच्या आईला पोलीसांच्या गाडीतून रुग्णालयामध्ये नेण्यात आलेले. (सर्व फोटो सौजन्य: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us