हिरोईनचा पांढरा ड्रेस, निरागस चेहरा अन् आमिरसोबतची केमिस्ट्री; 3 दशकांपासून कपल्सचं फेव्हरेट गाणं

१९९२ मध्ये आलेल्या या गाण्याने अनेकांच्या मनात खास जागा निर्माण केली. आयशा झुल्काचा तो साधा लूक आणि आमिर खानसोबतचे सीन आजही चाहत्यांच्या आठवणीत आहेत. या गाण्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

| Updated on: Nov 29, 2026 | 11:58 PM
1 / 5
१९९२ मध्ये आलेल्या 'जो जीता वही सिकंदर' चित्रपटातील 'पहला नशा' हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. पहिल्या प्रेमाची भावना या गाण्यात अतिशय सुंदर पद्धतीने दाखवण्यात आली आहे. त्यामुळे आजही हे गाणं ऐकल्यावर अनेकांना त्यांच्या कॉलेजच्या दिवसांची आठवण येते.

१९९२ मध्ये आलेल्या 'जो जीता वही सिकंदर' चित्रपटातील 'पहला नशा' हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. पहिल्या प्रेमाची भावना या गाण्यात अतिशय सुंदर पद्धतीने दाखवण्यात आली आहे. त्यामुळे आजही हे गाणं ऐकल्यावर अनेकांना त्यांच्या कॉलेजच्या दिवसांची आठवण येते.

2 / 5

या गाण्यात आयशा झुल्का पांढऱ्या ड्रेसमध्ये दिसली होती. तिचा निरागस चेहरा आणि साधा अंदाज चाहत्यांच्या मनात घर करून गेला. तिच्या या लूकची आजही सोशल मीडियावर चर्चा होते.

3 / 5

आमिर खानने या गाण्यात प्रेमात पडलेल्या तरुणाची भूमिका साकारली होती. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि आयशासोबतचे सीन प्रेक्षकांना खूप भावले. कोणताही भव्य डान्स नसतानाही या गाण्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं.

4 / 5

उदित नारायण आणि साधना सरगम यांनी या गाण्याला आपला आवाज दिला आहे. मन्सूर खान यांच्या चित्रपटातील या गाण्याचं संगीत जतिन-ललित यांनी दिलं होतं. गाण्याचे बोल मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिले होते.

5 / 5

या गाण्याला रिलीज होऊन तीन दशकांहून अधिक काळ झाला आहे. मात्र, आजही प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेकजण या गाण्याचा वापर करतात. सोशल मीडिया रील्सपासून ते कॉलेजच्या कार्यक्रमांपर्यंत या गाण्याची क्रेझ कायम आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us