
मिथुन: राशीचक्रातील मिथुन रास ही सर्वांत शांत रास मानली जाते. या राशीचे लोक स्वत: शांत राहतात आणि इतरांनाही शांत करतात. त्यांच्या याच स्वभावामुळे त्यांचा कोणाशीही वाद होत नाही. इतरांशी कसं बोलावे हे त्यांना खूप चांगल्या प्रकारे माहीत असते. म्हणूनच ते आपल्या बोलण्याने कोणाचीही मनं जिंकतात.

कर्क: कर्क राशीचे लोक खूप शांत असतात. ही राशी जल तत्वाची रास असून तिचा स्वामी चंद्र आहे. यामुळे या राशीचा स्वभाव शांत शितल असतो. त्यामुळे हे लोक कोणाच्याही सहज पसंतीस उतरतात.

कन्या : या राशीचे लोक खूप हुशार असतात त्यामुळे त्यांना अनेक जण फॉलो करतात. या राशीच्या व्यक्तींना राग आला तरी ते राग व्यक्त करत नाहीत. बोलून समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करातात. प्रत्येक समस्या बोलून सोडवता येते या गोष्टीवर त्यांचा ठाम विश्वास असतो.

कुंभ: कुंभ राशीच्या लोकांना अतिशय साधे जीवन जगणे आवडते. या राशीचे लोक इतरांना खूप मदत करतात आणि नेहमी योग्य मार्गदर्शन करतात. हे लोक खूप सकारात्मक असतात त्यांच्या आयुष्यातून ते लोकांना प्रेरणा देतात.