Photos : पालघरमधील एका गावतळ्यातील 12 व्या शतकाच्या दुर्मिळ पुरातन मूर्ती
Photos : पालघरमधील एका गावतळ्यातील 12 व्या शतकाच्या दुर्मिळ पुरातन मूर्ती | Photos Ancient idols found in a village of Javhar Palghar
-
-
पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामध्ये ग्रामदान मंडळ जामसर या गावातील तळ्यात 12 व्या शतकातील व मध्ययुगीन काळातील अनेक दुर्मिळ शिल्प सापडले आहेत.
-
-
त्यामुळे हे गाव सध्या चर्चेत आले आहे. गावातील तलावात सापडलेल्या मूर्तींमुळे 12 व्या शतकातील व मध्ययुगीन काळातील इतिहासाची पाने उघडणार आहेत.
-
-
तसेच अनेक ऐतिहासिक अभ्यासकांना या शिल्पाचा अभ्यास करायला मिळणार आहे. ग्रामस्थांना खोदकाम करताना या मूर्ती सापडल्या.
-
-
आता या ठिकाणी सरकारच्या पुरातत्व खात्याने खोदकाम करावं, अशी मागणी होत आहे. जेणेकरुन काही दडलेल्या ऐतिहासिक वस्तू समोर येतील आणि मध्ययुगीन काळातील इतिहास सर्वाना कळेल.
-
-
या ठिकाणी अनेक दुर्मिळ शिल्पं सापडली आहेत. या शिल्पांमध्ये वीरगळे आहेत. वीरगळे म्हणजे लढाईत मरण पावलेल्या वीराचे प्राचीन स्मारकं.
-
-
सापडलेल्या शिल्पांमध्ये एक दुर्मिळ शिल्प देखील आहे. 5 तोंडाची गाय, खाली एक वासरु आणि एकच शरीर असं दुर्मिळ शिल्पही या खोदकामात सापडलं आहे.
-
-
या भागात खोदकाम केले तर अनेक दडलेल्या ऐतिहासिक वस्तू समोर येतील. यामुळे 12 व्या शतकातील व मध्ययुगीन काळातील इतिहास सर्वाना कळेल.
-
-
मंदिरांची रचना करण्यात आलेले कोरीव कामं हे सर्वाना पाहता येईल, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासाकडे केली.
-
-
या गावात एकूण 3 तळी आहेत. अनेक दशकांपासून या तळ्यातील पाणी आटलेलं नाही, असं स्थानिक ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्यामुळे या तळ्यांखालीही काही पुरातन गोष्टी आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.