
अभिनेत्री परिणीती चोप्रा ही कायमच चर्चेत असते. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न अत्यंत शाही पद्धतीने काही दिवसांपूर्वीच पार पडले. विशेष म्हणजे या लग्नाचे खास फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले.

राघव चड्ढा याच्या डोळ्याची शस्त्रक्रिया काही दिवसांपूर्वीच विदेशात झाली. अत्यंत गंभीर आजार राघव चड्ढाला झाला होता. ज्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली.

राघव चड्ढा हा आता भारतामध्ये परतला आहे. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे पोहचले होते.

आता सिद्धिविनायक मंदिरातील राघव चड्ढा आणि राघव चड्ढा यांचे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. यावेळी परिणीती खास लूकमध्ये दिसली.

यावेळी पापाराझी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे न देताच राघव आणि परिणीती निघून गेल्याचे बघायला मिळाले. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर परिणीती आणि राघव यांनी लग्न केले.