Photos: देशभरात नवरात्रीचा उत्साह, मंदिरांबाहेर भक्तांची गर्दी

देशभरात आजपासून (17 ऑक्टोबर) नवरात्रोत्सवाचं पर्व सुरु झालं आहे. नवरात्रीमध्ये 9 दिवस दुर्गा मातेच्या 9 रुपांची पूजा केली जाते.

Photos: देशभरात नवरात्रीचा उत्साह, मंदिरांबाहेर भक्तांची गर्दी
संपूर्ण देशात कोरोनाच्या छायेत नवरात्रीचा उत्सव साजरा केला जात आहे.
| Updated on: Oct 17, 2020 | 8:04 PM

देशभरात आजपासून (17 ऑक्टोबर) नवरात्रोत्सवाचं पर्व सुरु झालं आहे. हिंदु धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. आजच्याच दिवशी दुर्गा मातेचं स्वर्गातून धरतीवर आगमन झाल्याची आख्यायिका आहे. नवरात्रीमध्ये 9 दिवस दुर्गा मातेच्या 9 रुपांची पूजा केली जाते. प्रत्येक दिवशी यातील एका देवीची उपासना होते आणि भक्त दुर्गा मातेकडून आशीर्वाद घेतात. यासाठी आज सकाळपासूनच मंदिरांबाहेर भक्तांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. संपूर्ण देशात कोरोनाच्या छायेत नवरात्रीचा उत्सव साजरा केला जात आहे.