
आपण कॉफीपासून विविध पदार्थ बनवतो. तसेच, बरेच लोक ब्लॅक कॉफी पितात. तुम्हीदेखी घरी सहजपणे कॉफीचे रोप लावू शकता, फ्रेश कॉफीचा आस्वाद घेता येईल. .

कॉफीचे रोप लावण्यासाठी, प्रथम एक कुंडी घ्या. त्यात चांगल्या प्रतीची माती टाका. मातीचा चांगला निचरा होईल याची खात्री करून घ्या आणि त्यात खत किंवा सेंद्रिय खत घाला.

आता मातीची पीएच पातळी तपासा. जर मातीची पीएच पातळी अंदाजे 6असेल तर कॉफीचे रोप चांगले वाढते. नंतर कॉफी बीन्स 1-2 इंचावर पेरा. नंतर त्या मातीने झाकून टाका.

रोपाला नियमितपणे पाणी द्या आणि सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा. जर तुम्ही रोप बियाण्यांपासून वाढवत असाल तर 2-3 महिन्यांत अंकुर वाढतील.

कॉफीची झाडे सुमारे 2-3 वर्षांनी फळं देतात. ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेले आहेत. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)