
PM Kisan Scheme 20th Installment : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता लवकरच बँक खात्यात जमा होणार आहे.

केंद्र सरकारने त्याची तारीख जाहीर केली आहे. जवळपास 9.5 कोटी लाभार्थी शेतकर्यांच्या खात्यात 20 हजार कोटींची रक्कम जमा होईल.

शेतकर्यांसाठी आनंदवार्ता आहे. सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता लवकरच जमा करणार आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये 19 वा हप्ता जमा करण्यात आला होता.

PM Kisan Yojana

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता या दिवशी जमा होणार

पीएम किसान योजनेचा यापूर्वी लाभ मिळाला असेल तर यावेळी लाभ मिळेल की नाही, यासाठी लाभार्थी यादी तपासावी लागेल. शेतकरी त्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही, हे तपासू शकतात. शेतकरी सरकारची अधिकृत साईट pmkisan.gov.in वर जाऊन त्यांचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही ते तपासू शकता.