
पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात जमा झाला आहे. तर आता शेतकऱ्यांना 22 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय पुढील हप्ता देण्यात येणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे. तर आता फार्मर आयडी शिवाय हप्ता जमा न होण्याची शक्यता आहे. सरकारने फार्मर आयडी काढण्याचे निर्देश दिले आहेत. त्याची पुर्तता करावी लागणार आहे.

एम किसान योजनेत बोगस लाभार्थ्यांना चाप बसावा यासाठी ईकेवायसी करणे सक्तीचे करण्यात आले आहे. तर आता फार्मर आयडीची सुद्धा सक्ती करण्यात आली आहे. फार्मर आयडी हा शेतकऱ्यांचा डिजिटल प्रोफाईल आहे. या ओळखपत्राआधारे योग्य शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.

शेतकरी AgriStack Portal ला भेट देऊन फार्मर आयडी तयार करू शकता. त्यासाठी शेतकर्यांना अगोदर युझर आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागेल. आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल.तो सबमिट करुन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. या बजेटमध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता वाढण्याची शक्यता आहे. सध्या एका वर्षाला तीन हप्त्यात 6,000 रुपये मिळतात. दोन हजार रुपयांचे प्रत्येकी तीन हप्ते मिळतात. पण या बजेटमध्ये पीएम किसान योजनेची रक्कम दुप्पट होण्याची शक्यता आहे. वार्षिक 12,000 रुपये मिळण्याची तरतूद करण्यात येईल.

PM Kisan Yojana ची नवीन तारीख अद्याप समोर आलेली नाही. पण केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, शेतकऱ्यांना आता चार हजार रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.

पण पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता प्राप्त करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे फार्म आयडी पूर्ण करणे हे आहे. फार्मर आयडी तयार केल्यानंतर शेतकर्यांना दुसरे महत्त्वाचे काम ई-केवायसीची पूर्तता करावी लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल त्यांचा हप्ता थांबवण्यात येऊ शकतो.

पीएम किसान योजनेचा अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ मिळतो. या योजनेत सध्या वार्षिक 6 हजार रुपये थेट खात्यात जमा करण्यात येतात. डीबीटी पद्धतीने ही रक्कम जमा होते. दोन हजार रुपयांचे तीन हप्ते जमा करण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करावी लागते. तर आता या योजनेसाठी Farmer ID ची पण गरज आहे.