
आज संपूर्ण देशात रक्षाबंधन हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. या सणाच्यादिवशी बहिण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हा सण आनंदाने साजरा केला आहे.

लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधान निवासस्थानी मोठ्या संख्येने उपस्थित शालेय विद्यार्थिनींनी पंतप्रधान मोदींना राखी बांधली. यावेळी पंतप्रधान मोदींनी या विद्यार्थिनींशी संवाद साधला आणि हास्य-विनोदही केला.

रक्षाबंधनाचा सण आज शनिवारी देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. भाऊ आणि बहीण यांच्यातील प्रेम दर्शवणाऱ्या या सणानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील अनेक मान्यवरांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी आज 7 लोक कल्याण मार्गावरील आपल्या निवासस्थानी आलेल्या अनेक शालेय विद्यार्थिनी आणि काही साध्वींनी राखी बांधली.

फोटोमध्ये दिसत आहे की पंतप्रधान नेरेंद्र मोठी विद्यार्थींनींसोबत राखी बांधताना गप्पा मारत आहेत. विद्यार्थीनींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा आहे.

पंतप्रधान मोदींनी केवळ शालेय विद्यार्थिनींकडूनच राखी बांधून घेतली नाही, तर ब्रह्मकुमारी या आध्यात्मिक संस्थेतून आलेल्या बहिणींकडूनही राखी बांधून घेतली.